Wed. Dec 8th, 2021

मुंबईत मुसळधार! मध्य रेल्वेची लोकलसेवा ठप्प

शनिवार, रविवार मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून नोंदवण्यात आला होता. त्यानुसार मुंबईत आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.

शनिवार, रविवार मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून नोंदवण्यात आला होता. त्यानुसार मुंबईत आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईत जनजीनव विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साठल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच लोकलही ठप्प झाली आहे.

पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत

मुंबईत आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसाचा परिणाम लोकल सेवेवर झाला आहे.

कुर्ला ते सायनच्या दरम्यान रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले असल्यामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरची सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे.

प्रवासी जवळच्या स्टेशनवरुन पायी चालत जात आहेत. कुर्ला स्थानकाच्या बाहेर प्रवाशी बेस्ट बसने प्रवास करण्यासाठी जात आहेत.

बेस्ट बस सुद्धा पूर्णतः भरून जात आहे तर रिक्षाचालक मात्र यादरम्यान प्रवाशांची लूट करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *