Tue. Jul 27th, 2021

मुंबईत पावसाचा जोर कायम! रेल्वे वाहतुकीवर परिणाम

कालपासून मुंबईत पडणारी संततधार आजही सकाळी जोरात सुरू आहे. या जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी भरलेले आहे.

कालपासून मुंबईत पडणारी संततधार आजही सकाळी जोरात सुरू आहे. या जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी भरलेले पाहायला मिळते. त्याचबरोबर याचा परिणाम म्हणून लोकल सेवेवर सुद्धा झालेला पाहायला मिळतोय कुर्ला ते सायन स्थानकांच्या दरम्यान रुळावर पाणी भरल्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झालेली आहे.

पावसाचा जोर कायम!

मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसामुळे आजही रेल्वे वाहतुकीवर काही मार्गावर ठप्प झाली आहे तर काही मार्गावर धिम्या गतीने सुरू आहेत.

मध्य रेल्वेवर अंबरनाथ स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. याचसोबत दिवा-कळवा, सायन-कुर्ला, चुनाभट्टी यासारख्या स्थानकांवरही पावसाचं पाणी आल्यामुळे अनेक गाड्या मध्ये अडकल्या आहेत.

ठाणे, कल्याण, अंबरनाथ-बदलापूर या स्थानकांत रेल्वे ट्रॅकवर  मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे.  त्यामुळे आताच्या घडीला मध्य रेल्वेची सेवा ठप्प झालेली पहायला मिळते आहे.

कल्याणच्या 7 पैकी 3 स्थानकांच्या ट्रॅकवर पावसाचं पाणी आलं आहे . त्यामुळे कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा मार्गही बंद करण्यात आलेला आहे.

हार्बर रेल्वेसेवेवरही या पावसाचा परिणाम झालेला आहे. सीएसएमटी ते वाशी ही सेवा पावसामुळे बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेवरच्या इतर सेवाही सुमारे अर्धा तास उशीराने सुरु आहेत.

याचसोबत लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या पावसाचा परिणाम झाला असून, मध्य रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *