Fri. Sep 20th, 2019

मुंबईमध्ये मुसळधार; सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात

मुंबई मध्ये पावसाचा जोर कायम असून सखल भागाता पाणी साचले आहे. दादार, हिदमाता, आणि सायन  परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

0Shares

मुंबई,ठाणे,कल्याण,डोंबिवली, वसई आणि पालघर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातील संततधार पावसामुळे दोन्ही मार्गावरील लोकल वाहतुक ही 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहे.

मुंबई मध्ये पावसाचा जोर कायम असून सखल भागाता पाणी साचले आहे. दादर, हिदमाता, आणि सायन  परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

दादर ,अंधेरी, जोगेश्वरी, ठाणे, मुंबई कल्याण, बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तरी पाहटेपासून पावसाचा जोर कमी झाला होता.

पंरतु सकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक परिसरात पाणी साचण्यास  पुन्हा सुरवात  झाली आहे.आज दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार असून मुसळधार पावसामुळे मुंबई व इतर ठिकाणी गणेश भक्तांमध्ये चिंता पसरली आहे. पावसाचा दोर दिवसभर असाच कायम राहीला तर त्याचा परिणाम दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावर होईल.

मुंबईतील पावसाची आकडेवारी (मिमी)

बोरीवली
1 तास – 1.77
24 तास – 57.37

सांताक्रूझ
1 तास – 4.06
24 तास – 116.82

कुलाबा
1 तास – 6.61
24 तास – 90.18

वरळी
1 तास – 6.09
24 तास – 132.32

अंधेरी
1 तास – 4.32
24 तास – 124.71

गोरेगाव
1 तास – 1.27
24 तास – 74.13

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *