गोदावरी नदीला पूर! नाशिकमधील अनेक मंदीरे पाण्याखाली
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्या आहेत दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने जवळपास आजही सहा धरणातून पाण्याचा विसर्ग वेगवेगळ्या नदीत करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्या आहेत दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने जवळपास आजही सहा धरणातून पाण्याचा विसर्ग वेगवेगळ्या नदीत करण्यात आला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून तब्बल वीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आल्याने गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील मोठा पूर आला आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेली अनेक मंदिरे पाण्याखाली गेले आहेत.
तसेच नाशिकचा पुराचा ओळख असलेल्या दुतोंड्या मारुती देखील पूर्णपणे बुडाला आहे. आजही नाशिक जिल्ह्यातील गंगापूर दारणा पालखेड आळंदी भावली नांदूर-मध्यमेश्वर या सहा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच सायखेडा आणि चांदोरी गावात देखील पाणी शिरल्याने अखिल काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आला आहे. नाशिक गोदावरी नदी परिसरातून पावसाचा आढावा
नाशिक शहरात पूरस्थिती
नाशिक शहरात पूरस्थिती गंभीर गोदावरी नदीच्या बाजूला असलेल्या सखल भागात पाणी शिरले आहे.
सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात भरलं पाणी असून मिलिंद नगर मध्ये देखील पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
महापुराची निशाणी समजल्या जाणाऱ्या नारो शंकराच्या घंटेपर्यंत पाणी पोहोचलं आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस तब्बल तीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
संपूर्ण त्रंबकेश्वर नगरी जलमय श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची गर्दी आहे. मात्र पावसामुळे त्यांचे हाल होतं आहेत.
गोदावरी आणि दारणा नदीतून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला असून नांदूरमध्यमेश्वर धारणातून तब्बल एक लाख 56 हजार विशेष पाण्याचा विसर्ग गोदापत्रात सुरु आहे.
गंगापूर, दारणा, भावली, आळंदी पालखेडआणि नांदूर-मध्यमेश्वर या सहा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी दारणा आणि कादवा या तीनही नद्यांची पाणी पातळीत वाढ झाली आहे.