Sat. Jun 19th, 2021

रायगड जलमय; मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

गेल्या दोन दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्रीपासून रायगडमध्ये पुर परीस्थिती निर्माण झाली. सावित्री, गांधारी, काळ, आंबा, कुंडलीका नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्रीपासून रायगडमध्ये पुर परीस्थिती निर्माण झाली. सावित्री, गांधारी, काळ, आंबा, कुंडलीका नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून महाड आणि नागोठण्यामध्ये नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

संपुर्ण रायगड जलमय

गेल्या दोन दिवसांपासून रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने याचा तेथील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

महाड, नागोठणे मध्ये पुर आल्याने महाड -रायगड, पाली – खोपोली रस्ता बंद करण्यात आला आहे.

सावित्री, गांधारी, काळ, आंबा, कुंडलीका नद्यांनी धोक्याची पातळी पार केली आहे.

गांधारी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने महाड – रायगड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

वाकण – खोपोली रस्तावर आंबा नदीचे पाणी जांभुळ पाडा आणि पाली पुलावरून वाहत असल्याने हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धोकादायक ठिकाणी नगरपालिका, महसुल विभाग, पोलीस कर्मचारी परीस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *