Wed. Jan 19th, 2022

चिपळूणमधील बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्याच्या 15 मेंढ्यांचा मृत्यू

उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू असून चिपळूणच्या वाशीष्टी आणि शिवनदीला पूर आला आहे. तसेच चिपळूण बाजारपेठेत शिरले पाणी जुना बाजारपुल, मच्छी मार्केट, नाईक कंपनी, भाजी मार्केट परिसरात पाणी भरले आहे.

उत्तर रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू असून चिपळूणच्या वाशीष्टी आणि शिवनदीला पूर आला आहे. तसेच चिपळूण बाजारपेठेत शिरले पाणी जुना बाजार पूल, मच्छी मार्केट, नाईक कंपनी, भाजी मार्केट परिसरात पाणी भरले आहे. या पावसाचा परिणाम तेथील बससेवेवरही झाला आहे. बाजारपेठेत पाणी साठल्यावे सर्व व्यापाऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

चिपळूणमधील पुराचा बाजारपेठेला फटका

चिपळूणमधील पुराच्या पाण्याचा फटका बाजारपेठेतील मटण व्यवसायिकांना बसला आहे. संपुर्ण बाजारपेठ पाण्याखाला आली आहे. चिपळूण शहरातील बाजारपेठेला नदीचं स्वरुप आलं आहे.

बहादूरशेख इथं एका मटण व्यावसायिकाच्या तब्बल 15 बकऱ्या पुराच्या पाण्यात गुदमरून मृत्यूमुखी पडल्या आहेत. बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांच मोठ आर्थिक नूकसान झालं. बाजारपेठेत 7 फूट पाणी साचलं आहे

चिपळूणच्या एसटी डेपोलाही फटका

सकाळपासून पडत असणाऱ्या पावसामुळे 213 पैकी 212 एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आली आहे.

या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे सुमारे साडे चार लाखांचं नुकसान झालं आहे.

चिपळूण एसटी डेपोत तीन फुटापर्यंत पाणी साठलं आहे यामुळे ग्रामीण भागातील एसटी सेवेला फटका बसला आहे.

दरड कोसळली

रत्नागिरी-दापोली ते सारंग रस्त्यावर दरड कोसळली आहे.

रोड बंद झाल्यामुळे 20 गावांचा संपर्क तुटला आहे.

काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे. अजूनही शेतात पाणी साठलं आहे.

मुंबई – गोवा महामार्ग वरील वाहतूक आद्यपाही ठप्पच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *