Mon. Jan 25th, 2021

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, हजारो लोक पुरात अडकले…

सांगली शहरात पुरामुळे खुप गंभीर अवस्था आहे. कृष्णा नदीच्या पाण्यात मात्र वाढ झाली आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा असून मोठया प्रमाणात लोक अडकले आहेत. चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा असल्याने प्रशासनाची मदत वेळेत पोहोचत नाही.

कोल्हापूरच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी सांगली शहरात पुरामुळे खुप गंभीर अवस्था आहे. कृष्णा नदीच्या पाण्यात मात्र वाढ झाली आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा असून मोठया प्रमाणात लोक अडकले आहेत. चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा असल्याने प्रशासनाची मदत वेळेत पोहोचत नाही.

सांगलीत गंभीर अवस्था

सांगलीतील पुरामध्ये हजारो लोक अडकले आहेत. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक भागात लोक पाण्यात अडकले आहेत. चोहोबाजूंनी पाणी असल्याने तिथपर्यंत पोहचण कठीण झालं आहे.

प्रशासनाची मदत वेळेवर पोहोचत नसल्याने हरीपुर मध्ये ३ हजार लोक अडकुन पडले आहेत. सांगलीवाडीत अजुनही १० हजार लोक अडकले आहेत. प्रशासन याठिकाणी पोहोचलं नसुन सवत्र प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

महापालिकेची ३ एनडी आर एफ च्या पथक यामध्ये बचावकार्याचे काम करत आहे. पीण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून अन्नधान्याचाही साठा संपला आहे. लहान मुलांसाठी दुधही लोकांना उपलब्ध होत नाही. अशी अवस्था झाली आहे.

१ लाख १९ हजार लोकांना पुरातुन बाहेर काढण्यात आलं आहे. २५ हजार जनावरांना रेस्क्यु करण्यात आलं आहे. तरीही अनेक लोक अडकून प्रशासनाच्या मदतीची वाट बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *