Wed. Jul 28th, 2021

आसाम, बिहार मध्ये मुसळधार पावसामुळे 23 जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका आसाम, बिहार या राज्यांना बसला आहे. या दोन्ही राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर बिहारमधील अनेक भाग संपुर्णपणे बंधाऱ्याखाली आहेत. या दोन्ही राज्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे

गेल्या काही दिवसात सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका आसाम, बिहार या राज्यांना बसला आहे. या दोन्ही राज्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर बिहारमधील अनेक भाग संपुर्णपणे बंधाऱ्याखाली आहेत. या दोन्ही राज्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसामुळे दोन्ही राज्यांना फटका

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक कुटूंब बेघर झाले आहेत. 10 लाख लोक बेघर झाले आहेत असं सांगण्यात येत. पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत होत असताना दिसत आहे.

आसाममध्ये गेल्या काही तासात 10 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. काही नद्या बंधाऱ्याखाली आल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे.

आसामधील ब्रम्हपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना पुर आला आहे. 33 जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती असून राज्यातील 1800 गावांच यामुळे नुकसान झालं आहे.

बिहारच्या उत्तर भागात जास्त पुराचा फटका बसला आहे. प्रभावित सीतामढ़ी, मोतिहारी, सुपौल, सहरसा, अररिया, किशनगंज, कटिहार, भागलपुर आणि पूर्णियात याचा जास्त परिणाम झाला आहे.

बिहारमध्ये पुरामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रशासनाकडून सुरक्षेची जबाबदारी घेण्यात आली असून हजारो लोकांना सुरक्षातळी हालवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *