Tue. Jan 28th, 2020

केरळमध्ये मुसळधार! 2 जण ठार तर 4 मच्छिमार बेपत्ता

केरळमध्ये गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने दोन जणांचे बळी घेतले आहेत. तर 4 मच्छिमार बेपत्ता आहेत.

केरळमध्ये गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने दोन जणांचे बळी घेतले आहेत. तर 4 मच्छिमार बेपत्ता आहेत. हे मच्छिमार मासेमारीसाठी गेले असता बेपत्ता झाले आहेत. केरळमधील काही जिल्ह्य़ात व्यावसायिक महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

केरळमध्ये मुसळधार!

केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसात आतापर्यंत दोन जण ठार झाले आहेत.

तामिळनाडूतील 3 मच्छिमारांसह चार मच्छिमार बेपत्ता आहेत. इडुकी येथे भूस्खलन झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

तिरुवल्ला येथे मणिमाला नदीत मासेमारी करताना 53 वर्षीय कोशी वर्गीस या इसमाचा मृत्यू झाला आहे.

कोल्लाममधील नींडकरा येथे समुद्रात गेलेले तमिळनाडूचे 3 मच्छिमार अजूनही बेपत्ता आहेत.

केरळमधील अनेक भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्य़ातील व्यावसायिक महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

लोकांनी पर्वतीय भागात प्रवास करण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *