Tue. Oct 26th, 2021

मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील जनजीवन विस्कळीत

रत्नागिरी:  चिपळूणमध्ये रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय झाले आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पावसानं थैमान घातलं असून खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर ला पुरस्थिती आली आहेाच परंतु चिपळूण मध्ये जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत . अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत,शेकडो लोक्कांचे नुकसान झाले आहे तसेच अनेक वाहने पाण्याखाली गेले आहेत ,झाडे पडली आहेत ,जनजीवन विस्कळीत झालं आहे . मदत कार्य सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ येथील अर्जुना नदी ची पाणी पातळी वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बं. चिपळूण खेड – दापोली खेड – बैरव अतिवृष्टीमुळे वाहतूक मार्ग बंद आहे. चिपळूण शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बरेच ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून नुकसान जीवीतहानी नाही. भोर मार्गावर पाणी शिरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

२६ जुलै २००५ ला ढगफुटी झाल्यामुळे चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यावधीचे नुकसान झाले होते . यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून २००५ ची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. मात्र हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्टचा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपायोजना केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *