Tue. Feb 25th, 2020

गडचिरोली जिल्ह्यात पुराचा धोका, वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणातून सकाळी ८.१० वाजता पासून १३७३९ क्युमेक्स एवढा विसर्ग सातत्याने सुरु असून CWC यांचे पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने दिलेल्या इशारानुसार उद्या सकाळी ८ वा. पासून २०००० क्युमेक्स एवढा विसर्ग सोडण्याची दाट शक्यता आहे.

वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणातून सकाळी 8 पासून 13739 क्युमेक्स एवढा विसर्ग सातत्याने सुरु आहे.  CWC ने दिलेल्या पूरपरिस्थितीच्या इशाऱ्यानुसार उद्या सकाळी 8 पासून 20000 क्युमेक्स एवढा विसर्ग सोडण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नदी किनारी नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात येत आहे.

पूरपरिस्थितीचा धोका

वैनगंगा व प्राणहिता नदीकिनारी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी उचित सतर्कता बाळगावी. तसेच गणपती विसर्जना दरम्यान विशेष खबरदारी घेण्यात यावी. पोलीस तसेच प्रशासनास सहकार्य करावे. नदीकिनारी जाण्याचे टाळावे. अतिआवश्यक कारणास्तव जात असल्यास योग्य ती खबरदारी घ्यावी.

पर्यटकांनी सेल्फीचा मोह टाळावा. पूरपरिस्थिती दरम्यान कोणत्याही परिस्थितीत नदीकिनारी जाऊ नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष गडचिरोली यांचे मार्फत करण्यात आले आहे.

भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी साचले असून आज सातवा दिवस त्यामुळे भामरागड शहरातील जनजीवन विस्सळीत झाले आहे. जवळपास 500 कुंटूबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था शासकीय इमारतीमध्ये करण्यात आली असून, आपती व्यवस्थान विभागामार्फ़त अधिक काळजी घेत आहेत.

अतिवृष्टी झाल्यामुळे पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ही आपती व्यवस्थापन विभागाकड़ून आरोग्य, अन्न यासारख्या व्यवस्था करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधुन मधून रिमझिम पाऊस येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *