Thu. Sep 29th, 2022

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबईत आणि मुंबई उपनगरात सकाळ पासून जोदार पाऊस पडत आहे. काल पासुनच जोर पकडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागात पाणी साचले आहे.अंधेरी सबवे, दहिसर भागात पाणी साचले आहे मुंबईत गेल्या १२ तासात ९५.८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात ११५.०९ मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात ११६.७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर दुसरी कडे नवी मुंबई मध्ये हि पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. सोमवार पाटोपाट मंगळवारी सकाळी पुन्हा पाऊसाने जोर धरला आहे. पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. यलो अलर्टजारी सांगितल्याने नवी मुंबई मनपाचे आपत्ती व्यवस्थापन देखील सज्ज झाले आहे. तर नवी मुंबई शहरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता हि दर्शवण्यात आली आहे. या पावसाळ्यातील हा पहिलाच मुसळधार पाऊस आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत तब्बल १६३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसं ट्वीट बएमसीने केले आहे.

सलग दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे तर यांचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे.वाहतुकीचा खोळंबा झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर लोकल ट्रेनचाही खोळंबा झाला आहे. आज सकाळपासून सेंट्रल रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पावसाचा सध्याचा जोर पाहता आजही मुंबईतील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.या पाऊसाचा फटका हार्बर लाईन वर देखील झाला आहे. लोकलवर ही झाला आहे. धीम्या गतीने लोकल चालू असल्याने प्रवाशांना ऑफिस ला पोहचण्यासाठी उशीर होत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.