Tue. Aug 9th, 2022

नवी दिल्लीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नवी दिल्लीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली असून. गेल्या आठवडाभरापासून प्रचंड उन्हामुळे होरपळलेल्या दिल्लीकरांची पहाट सुखद गारव्याने झाली आहे. सुसाट वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट दिल्लीत जोरदार पाऊस झाला. उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळं काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याचे चित्र दिसून येत आहे तर काही ठिकाणी रस्ते बंद झाल्याचे दिसत आहे. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच विमान सेवेवरही मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. १०० हुन अधिक झाडे पडल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत येत आहे

दरम्यान,सोमवारी दिल्लीत कमाल तापमान ३९ आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. गडगडाटासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. मंगळवारीही असेच वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, बुधवार ते शनिवारपर्यंत आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपासून हवामान निरभ्र होण्याची शक्यता आहे.दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४ मे रोजीही दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार , संपूर्ण दिल्ली आणि एनसीआरच्या लगतच्या भागात ९० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. खराब हवामानासह पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम दिल्ली विमानतळावरही झाला आहे. दिल्ली एनसीआर तसेच लगतच्या भागात ६० ते ९० किमी प्रतितास वेगाने वारे आणि मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.