‘विराट’ चं वजन 1500 किलो!

तब्बल 1500 किलो वजनाचा रेडा आपण पाहिलाय का? असे महटल्यास आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. कारण असाच एक विराट नावाचा रेडा लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जोपासलाय. लातूर येथील सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित कृषी व पशु प्रदर्शनात आकर्षणाचा विषय ठरलाय.
लातूर येथे सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित कृषी व पशू प्रदर्शनास आज सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात लातूर तालुक्यातील शिवणी येथील अजित प्रल्हाद बोराडे यांचा विराट हा मुरा जातीचा रेडा प्रमुख आकर्षण ठरलाय.
वजनदार ‘विराट’
विशेष म्हणजे विराट हा गेल्यावर्षीच्या पशू प्रदर्शनातील विजेता आहे. विराटला अनेक राष्ट्रीय पशू प्रदर्शनात सन्मानित देखील करण्यात आलंय. जवळपास 1500 किलो वजन असलेला विराट अवघ्या साडे 4 वर्षाचा आहे.

दररोज विराटला 25 किलो चारा आणि 10 किलो इतर खुराक लागतो. महिन्याला विराटच्या खुराक आणि चाऱ्याला 7 ते 8 हजार रुपये लागतात.
लातूर येथील शिवणी गावात जन्मलेला आणि इथेच वाढलेला हा रेडा राज्यातील पशूपालकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. मात्र अशा पशूपालनात होणारा खर्च अवाक्याच्या बाहेरचा असल्याने शासनाने प्रोत्सहान म्हणून काही तरी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.