नाशिक पोलिसांची हेल्मेट सक्ती मोहीम तीव्र

नाशिकमध्ये पोलिसांनी हेल्मेट सक्ती मोहीत सुरू केली आहे. विनाहेल्मेट दुचाकीवर फिरणाऱ्या प्रवशांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे सक्तीचे झाले असून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वाराला पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
नाशिकमध्ये अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करत असतात. तसेच दरम्यान विनाहेल्मेट प्रवास करताना रस्ते अपघातांमध्ये या प्रवाशांना मृत्यूला सामना करावा लागतो. त्यामुळे दुचाकीवर प्रवास करताना दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. तरिही काही दुचाकीस्वार विनाहेल्मेट फिरताना दिसतात. त्यामुळे विनाहेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर आता दंडात्मक कारवाई होणार असल्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे. नाशिक पोलिसांची हेल्मेट सक्ती मोहीम तीव्र झाली असून दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यास त्या दुचाकीस्वाराकडून पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
दुचाकीस्वार हेल्मेट न घालता मोकाट फिरण्याचे चित्र नाशिकमध्ये दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे आता विनाहेल्मेट फिरणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. तसेच हेल्मेट न वापरल्यास दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.