Mon. Sep 23rd, 2019

पुणेकरांनो हेल्मेटसक्ती आहेच… कारवाईची पद्धत बदलली

Women two wheeler rider in Chandigarh on Saturday, May 02 2015. Express Photo by Kamleshwar Singh

0Shares

वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुण्यात हेल्मेटसक्तीवरून वाद सुरू आहे. पुण्यात हेल्मेटसक्तीवरून नेहमीच वाद उफळून येत असल्यामुळे पुण्याच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हेल्मेटसक्तीवर स्थगिती दिली असल्याचे आमदारांच्या शिष्टमंडळाने म्हटलं. मात्र हेल्मेटसक्ती कायम असून कारवाई वेगळ्या पद्धतीने करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पुण्यात हेल्मेटसक्तीवरून अनेक वाद निर्माण झाले आहेत.

हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी पूर्णपणे विरोध केला असून अनेक आंदोलनही केले आहेत.

यासंदर्भात पुण्याच्या आमदारांच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी हेल्मेटसक्तीला स्थगिती दिली असल्याचे पुण्याच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने सांगितले.

मात्र त्यांच्याकडून ऐकण्यात चूक झाली असल्याचे म्हटलं आहे.

त्यामुळे हेल्मेटसक्तीला स्थगिती मिळाली नसून फक्त कारवाई वेगळ्या पद्धतीने होणार असल्याते समोर आले आहे.

दुचाकी स्वाराने हेल्मेट न घालता दुचाकी वापरली तर त्याला वाहतूक पोलीस रस्त्यामध्ये अडवणार नाही.

ही कारवाई सीसीटीव्हीमध्ये नोंद होणार असून दंडाची पावती घरी येणार आहे.

त्यामुळे वाहतूक पोलीस रस्त्यातमध्ये न अडवता दंडाची पावती घरी किंवा ऑफिसमध्ये येणार असल्याचे समजते आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *