Thu. Sep 29th, 2022

दुचाकीवर प्रवास करण्यासाठी लहान मुलांना हेल्मेट बंधनकारक

  देशात दररोज रस्ते अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. रस्ते अपघातांमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे दुचाकीवरून प्रवास करताना लहान मुलांनी हेल्मेट घालणे बंधनकराक असणार आहे. तसेच चारचाकी गाड्यांमध्येही लहान मुलांसाठी बूस्टर सीट सक्तीची करण्यात आली आहे.

  केंद्रीय मोटर वाहन कायद्यात कलम १२९ हा नवा कलम जोडण्यात आला आहे. या कलमांतर्गत ४ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना दुचाकीवर प्रवास करण्यासाठी हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. लहान मुलांना घालण्यात येणारे हेल्मेट हे आयएसआय मार्कचे असण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहे.

  शीख बांधवांनी पगडी घातली असल्यास त्यांना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल असेही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शांतता क्षेत्रात अनावश्यक हॉर्न वाजवल्यास संबंधित व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.