Mon. Sep 27th, 2021

माझे पैसे वापरुन जेटला आर्थिक संकटातून वाचवा – मल्ल्या

 

सध्या जेट एअरवेज आर्थिक संकटात असल्यामुळे सरकराने 26 बॅंकांकडे कर्जासाठी मागणी केली आहे. मात्र फक्त 2 बॅंकांनी मदत करण्यास तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. जेटला उभारी देण्यासाठी सरकार बॅंकाकडे कर्ज मागत असल्याने किंगफिशरला सरकराने काहीच मदत केली नसल्यामुळे कर्जबुडव्या विजय मल्ल्याने ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच आपण जेटला उभारी देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाला विजय मल्ल्या ?

 

सध्या जेट एअरवेज आर्थिक संकटात असून त्यांची मदत करण्यासाठी सरकार धडपड करत आहे.

पुन्हा किंगफिशरसारखे होऊ नये म्हणून सरकार बॅंकाकडे कर्जाची मागणी करत आहे.

26 बॅंकापैकी 2 बॅंकांनी मदत करण्यास तयारी दाखवली आहे.

त्यामुळे सरकारने विजय मल्ल्याला मदत करण्यासाठी काही केले नसल्याने त्यांनी सरकारवर टीका केली.

विजय मल्ल्याने ट्विट करत याबाबतीत खंत व्यक्त केली आहे.

मल्ल्या म्हणाले, मी किंगफिशर एअरलाइन्स आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी 4000 कोटींची गुंतवणूक केली.

मात्र याची दखल न घेता माझ्यावर प्रचंड टीका केली.

मात्र सरकारी बॅंकांनी एका सर्वोत्कृष्ट एअरलाइन्स आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना बुडू दिले.

एनडीए सरकराची ही दुटप्पी भूमिका असल्याचे ते म्हणाले.

भाजपा सरकराने किंगफिशरला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केला नाही.

मात्र कॉंग्रेस सरकारच्या काळात किंगफिशरला मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावर वारंवार टीका करण्यात आली.

भाजपा सरकारही जेटला वाचवण्यासाठी तेच करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

कर्ज फेडण्यासाठी माझ्या संपत्तीची मागिती कर्नाटक उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. तरीही बॅंका माझे पैसे का घेत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

माझे पैसे वापरुन जेट एअरवेजला वाचवू शकतात असेही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *