Jaimaharashtra news

संतप्त मुलाने रुग्णवाहिका घातली थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

बुलडाणा: एका कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयात खाट न मिळाल्याने या महिलेच्या मुलाने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच रुग्णवाहिका आणून उभी केली. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ माजली.

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मोलखेडा या गावातील हा मुलगा आहे. आपल्या ६५ वर्षीय कोरोनाबाधित आईला घेऊन हा मुलगा सकाळी ११ वाजल्यापासून शासकीय कोरोना रुग्णालयासह सर्व खासगी रुग्णालयं पालथी घालत होता. कोणतेही रुग्णालय त्याच्या आईला भरती करून घ्यायला तयार नसल्याने शेवटी कंटाळून या मुलाने आपल्या आईसह थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

यावेळी तेथे उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी भूषण अहिरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात या महिलेला भरती करून घेण्यात आलं.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Exit mobile version