चिकन खाणारी अजब कोंबडी Tik Tok वर व्हायरल!

Tik Tok वर एकाहून एक व्हिडिओ पाहायला मिळत असतात. मात्र सध्या एका कोंबडीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ही कोंबडी फारच अजब आहे. इतरवेळी धान्याचे दाणे खाणारी कोंबडी चक्क स्वतःच चिकन लेग पीसवर ताव मारताना दिसत आहे.

एकीकडे Corona Virus मुळे लोकांनी चिकन, मटण या पदार्थांपासून तौबा केली आहे. लोकांनी चिकन खाणं बंद केल्यामुळे पोल्ट्री फार्म्स मालक रडकुंडीला आले आहेत. करोडो रुपयांचा फटका बसतोय. अवघ्या 10 रुपयांना कोंबड्यांची विक्री होतेय. चिकन फेस्टिवल आयोजित करून ग्राहकांमध्ये जागृती करून चिकन खाण्यासाठी उद्युक्त केलं जातंय. मात्र अशा परिस्थितीत चक्क एक कोंबडीच स्वतः चिकन लेग पीस खातेय. असा व्हिडिओ सध्या Tik Tok वर गाजतोय.

@lukemil4 याने Tik Tok वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कोंबडीला मालक आधी लेग पीस भरवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आधी दुर्लक्ष करणारी कोंबडी नंतर मात्र चिकन लेग पीसचा आस्वाद घ्यायला लागते, असं व्हिडिओत दिसतं. कोंबडीच कोंबडीची तंगडी खातेय, हे पाहून स्वतः मालकही हैराण होतो आणि तिला तू स्वजातभक्षक असल्याचं चिडून म्हणतो, असं व्हिडिओत दिसतं. या व्हिडिओल 3 लाखांपेक्षा जास्त Views मिळाले आहेत.  

Exit mobile version