Sun. Oct 17th, 2021

‘तान्हाजी’संदर्भातील ‘त्या’ विधानानंतर संतापलेल्या अजय देवगणने तोडले सैफ अली खानचे हात पाय?

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणारा ‘सूर्यवंशी’या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला ‘सिम्बा’ रणवीर सिंग आणि ‘सिंघम’ अजय देवगण उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी अजय देवगणला तान्हाजी सिनेमासंदर्भात सैफ अली खानने केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल छेडलं. सैफ अली खान आणि अजय देवगण यांच्यांत सिनेमानंतर वाद झाल्याचं वृत्त होतं.

या प्रश्नाला उत्तर देताना अजय देवगण म्हणाला ‘हो आमच्यात खूप भांडण झालं. मी त्याला बदडून काढलं. त्याचे हात-पाय तोडले. आता तो चालूही शकत नाही.’ या उत्तरानंतर अजय देवगणने या बातम्या कोणी पसरवल्या असा सवाल केला. ‘तुम्हाला अशा बातम्या कोण देतं? आमच्या दोघांत प्रत्यक्षात कोणतंही भांडण नाही. तो आणि मी आधीही मित्र होतो, आताही चांगले मित्र आहोत.’ असं स्पष्ट केलं. सैफ अली खान आणि अजय देवगण यांच्यामध्ये तान्हाजी सिनेमानंतर वाद झाल्याच्या केवळ अफवाच निघाल्या आहेत.

काय घडलं होतं नेमकं?

‘तान्हाजी’ सिनेमामध्ये अभिनेता, निर्माता अजय देवगण याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे बबाद्दूर मावळे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकरली, तर खलनायक उदयभान राठोडची भूमिका सैफ अली खानने वठवली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. अजूनही चांगली कमाई करत आहे. या सिनेमातील सर्व कलाकारांच्या भूमिकाही वाखाणल्या गेल्या. मात्र त्यानंतर एका मुलाखतीत तान्हाजीमध्ये दाखवलेला इतिहास खोटा असून त्याकाळी भारत अस्तित्वातच नव्हता, असं वादग्रस्त विधान सैफ अली खानने केलं. या विधानावरून त्याच्यावर टीका झाली. त्याला ट्रोलही करण्यात आलं. या विधानामुळे अजय देवगण आणि सैफ अली खानमध्ये भांडण झाल्याचं वृत्त होतं. मात्र हे वृत्त खरं नसल्याचा निर्वाळा खुद्द अजय देवगणनेच केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *