मुंबईच्या लाईफलाईनवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतचे आदेश

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतल्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

मुंबईतल्या सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या लाइफलाइनवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.

दहशतवादी मुंबईतल्या रेल्वे स्थानकांना लक्ष्य करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

त्यामुळे पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे.

सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, असे आदेश रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.

गुप्तचर यंत्रणांनी पुढच्या 3 महिन्यांत मुंबई रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे.

मुंबई रेल्वे स्थानकांनाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

तत्पूर्वी मुंबईजवळच्याच कर्जत-आपटा एसटीमध्ये बॉम्ब सापडला होता.

बुधवारी रात्री आपटा एसटी डेपोत आली असता, कंडक्टरला बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली.

ही वस्तू आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हा बॉम्ब निकामी केला.

या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला असून, लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

ज्या कर्जत-आपटा एसटीमध्ये बॉम्ब सापडला ती बस दिवसभर पोलीस संरक्षणात ठेवण्यात आली होती.

 

Exit mobile version