… तर पाच महिन्यांनतरही गर्भपात शक्य

एखाद्या गर्भवती महिलेच्या आरोग्याला धोका असल्यास किंवा गर्भामध्ये काही दोष आढळल्यास 20 आठवडे उलटल्यानंतरही न्यायालयाच्या परवानगीशिवाय गर्भपात करता येणार आहे, असा निर्णय मुंबई उच्चन्यायालयाने घेतला आहे. यापूर्वी गर्भवती स्त्रीला 5 महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भामध्ये काही व्यंग असल्यास किंवा मातेच्या आरोग्याला धोका असल्यास गर्भपाताची परवानगी नव्हती. यासाठी संबंधित डॉक्टर आणि गरोदर महिलेला कायदेशीर परवानगी अपरिहार्य होती, मात्र आता यापुढे असे आढळून आल्यास परवानगीची गरज लागणार नसल्याचे स्पष्ट करणारे 78 पानांचे निकालपत्र जाहीर करण्यात आलं आहे.
काय हे उच्चन्यायालयाचा निर्णय ?
गर्भामध्ये शारीरिक, बौद्धिक व्यंग किंवा आईच्या आरोग्याला धोका असल्यास पाच महिने उलटल्यानंतर गर्भपाताची परवानगी लागणार नाही.
यापूर्वी पाच महिने उलटल्यानंतर गर्भपाताची परवानगी दिली जात नव्हती, त्यासाठी कायदेशीर अनुमती घ्यावी लागत होती.
संबंधित डॉक्टर तसेच गरोदर महिलेला यासाठी आगाऊ परवानगी घ्यावी लागायची किंवा कारवाईला सामोर जावं लागत होत.
याबाबत गर्भवती स्त्रियांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.
त्यावर कायमस्वरूपी विचार करत मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय लावला आहे.
याचा भवितव्यामध्ये माता आणि गर्भ यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे असेल.
…यामध्ये गर्भ जिवंत राहिल्यास ?
या गर्भपातामध्ये गर्भ जिवंत राहिल्यास त्या गर्भावर आवश्यक ते औषधोपचार करण्याची जबाबदारी डॉक्टर आणि संबंधित हॉस्पिटलची असेल.
अशा जिवंत गर्भाच्या भविष्याचा विचार करता अशा गर्भांना त्याचे पालक स्विकारण्यास असमर्थ असतील तर त्याचे पालकत्व हे आपोआप सरकारकडे जाईल.
अशा गर्भाला निराधार मुले घोषित करून पुढे दत्तक म्हणून देता येईल.असंही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.