Sun. Apr 18th, 2021

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक

मुंबईतील कोरोना रुग्णवाढीने नवा उच्चांक गाठला असून रविवारी तब्बल ११ हजार १६३ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली, तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.६१ टक्क्य़ांवर पोहोचला असून रुग्णदुप्पटीच्या कालावधीत कमालीची घसरण झाली आहे. बाधित रुग्णांच्या शोधार्थ पालिकेने रविवारी ५१ हजारांहून अधिक चाचण्या केल्या आहेत .

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी मुंबईतील ११ हजार १६३ जणांना बाधा झाल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५२ हजार ४४५ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले १३ पुरुष आणि १२ महिलांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी १८ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत ११ हजार ७७६ मुंबईकरांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले तब्बल ५ हजार २६३ जण रविवारी कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ लाख ७१ हजार ६२८ वर पोहोचली आहे, तर सध्या ६८ हजार ०५२ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचाराधीन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *