सोलापूर बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव

सोलापूर : सोलापुरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशी ही लीलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. चांगल्या दर्जाचा गावरान कांदा, तसेच लाल कांद्याला विक्रमी 150 रुपये किलो भाव मिळाला आहे.
गतवर्षीचा दुष्काळ आणि यावर्षाची अतिवृष्टीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने त्यांच्यात समाधानचे वातावरण आहे .
सध्या कांद्याच्या दराने विक्रम केला आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक कांदा हा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे.
सलग दुसऱ्या दिवशी लीलावात कांद्याला क्विंटलला 15 हजारांचा भाव मिळाला . नाशिक , हिंगोली , नंदुरबारसह 13 जिल्ह्यातील 54 तालुक्यातुन शेतकरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितिमध्ये कांदा विक्रीसाठी आणत आहेत.