Sat. Nov 27th, 2021

नाशिक बाजार समितीत कोथिंबीरीला उच्चांकी भाव

नाशिक बाजार समितीत कोथिंबीरीला उच्चांकी भाव मिळालाय. 33000 रुपये शेकडा म्हणजेच 300 रुपये जुडी इतक्या मोठ्या प्रमाणात भाव मिळाला आहे. कोथिंबीरसह इतरही पालेभाज्यांचे भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. आवक घटल्याने पालेभाज्यांच्या किमतीत वाढ होत असल्याची माहिती बाजार समितीकडून मिळालीय.

खरंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होतं. नाशिक मधून मुंबई आणि इतर ठिकाणीदेखील भाजीपाला पुरवठा केला जातो. त्यामुळे नाशिकमध्ये भाव वाढल्यानंतर मुंबईमध्ये देखील भाजीपाल्याचे भाव वाढतात.

सध्या नाशिक बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात अशा पालेभाज्यांचे विशेष करून भाव वाढल्याचे परिस्थिती पाहायला मिळते.

पालेभाज्या आणि भाजीपाल्यांची आवक घटल्याने मागचे काही दिवसांपासून हे भाव वाढत आहेत.

येणाऱ्या काळात देखील भाजीपाल्याची आवक वाढली नाही, तर अशाच प्रकारे भाव असतील असे देखील अंदाज आहे.

 

कोथिंबीर 331 रुपये जुडी

मेथी 55 रुपये जुडी

शेपू 25 रुपये जुडी

कांदा पात 32 रुपये जुडी

टोमॅटो 35 रुपये किलो

कारले 41 रुपये किलो

दोडक 52 रुपये किलो

गव्हार 50 रुपये किलो

काकडी 37 रुपये किलो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *