Wed. Jan 19th, 2022

हिमा दासची अप्रतिम कामगिरी; 15 दिवसात चार सुर्वण पदक

भारताची वेगवान धावपटू हिमा दासने पुन्हा एकदा भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. गेल्या 15 दिवसात हिमा दासने चौथे सुवर्णपदक मिळवले आहे. चेक रिपब्लिक येथे सुरू असलेल्या टॅबर ऍथलेटिक्स मीटवर विक्रम नोंदविला आहे. तसेच पुरुषांच्या 400 मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने दुसरे सुर्वण पदक मिळवले आहे.

हिमाची अप्रतिम कामगिरी – 

हिमा ने अवघ्या २३.२५ सेकंदात २०० मीटर अंतर पार करत सुवर्णपदकावर आपला शिक्कामोर्तब केला.

यापूर्वी हिमाने २, ६ आणि १४ जुलैला अनुक्रमे तीन सुवर्णपदक पटकावली होती.

विशेष म्हणजे हिमाने महिन्याच्या वेतनातून अर्धे वेतन आसाममधील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले.

याशिवाय हिमाने इतर लोकांना देखील पूरग्रस्तांना मदत करण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *