Sun. Sep 22nd, 2019

अवघ्या 2 आठवड्यांत 3 सुवर्णपदकं… हीमा दासची शानदार कामगिरी!

0Shares

क्रिकेट वर्ल्ड कप फायनल आणि विम्बल्डन फायनल दोन्हीमध्ये भारतीय खेळाडू नसूनही भारतीयांना त्यात कमालीचा रस होता. क्रिकेट वर्ल्ड कप न्यूझीलंडने जिंकावा आणि जोकोविच- फेडररमधील विम्बल्डन अंतिम सामना फेडररने जिंकावा अशी बहुसंख्य भारतीयांची इच्छा होती. मात्र या दोन्ही आघाड्यांवर भारतीयांच्या पदरी निराशा आली. याउलट भारतीय धावपटू हीमा दास (Hima Das) हिने दोन आठवड्यांमध्ये कमालीची कामगिरी करत तिसरं सुवर्ण पदक जिंकलं, याकडे मात्र भारतीयांचं लक्ष वेधणं आवश्यक आहे.

क्लांदो मेमोरियल एथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर स्पर्धेत हीमाने सुवर्णपदक मिळवलं.

शनिवारी झालेल्या या स्पर्धेत हीमाने 23.43 सेकंदात धाव पूर्ण केली.

2 जुलै रोजी 200 मीटर रेसमध्ये हीमाने 23.65 सेकंदांत धाव पूर्ण करून हीमाने सुवर्ण पदक पटकावलं होतं.

8 जुलै रोजी 200 मीटर रेसमध्येही हीमाने 23.97 सेकंदांत धाव पूर्ण करून सुवर्ण कमाई केली.

खडतर प्रवासातून यशाकडे धाव

याच हीमा दासला 2017 पर्यंत हीमाकडे (Heema Das) एथलेटिक्ससाठी कोच नव्हता. चांगल्या कोचिंगसाठी गुवाहाटीला पाठवण्यासाठीही हीमाच्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते. अखेर गुवाहाटीमधील कोचनेच तिच्या राहयचा, खायचा खर्च उचलला. आज असा खडतर परिस्थितीतून पुढे येत हीमा दासने विक्रम रचलाय. अवघ्या दन आठवड्यांत 3 Gold Medals मिळवून भारताची मान उंचावली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *