Sat. Dec 14th, 2019

‘त्या’ 2 हिंदू मुलींच्या धर्मपरिवर्तन प्रकरणात नवं वळण!

पाकिस्तानात दोन हिंदू मुलींचं अपहरण करून त्यांच्याशी निकाह आणि जबरदस्ती धर्मपरीवर्तन करण्यात आल्याच्या वृत्ताने केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर भारतातही तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान ख़ान यांनी पंजाब सरकारला या घटनेत लक्ष घालून मुलींचा शोध घेण्याचा आदेश दिला होता. या मुलींना जेव्हा इस्लामाबादमधील कोर्टात  हजर करण्यात आलं, तेव्हा मात्र या प्रकरणाला नवं वळण लागलं.

त्या viral व्हिडिओमुळे माजली खळबळ!

काही दिवसांपूर्वीच मुलीच्या भाऊ आणि वडिलांचा आपलं दु:ख व्यक्त करणारा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचं म्हणण्यात आलं होतं.

भाई सलमान दास, पुत्र हरि दास मेघवार यांच्या जुबानीवर दहारकी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

रविवारी भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या बाबतीत इस्लामाबादेतील भारताच्या उच्चायोगाकडून रिपोर्ट मागण्याच्या गोष्टीसंदर्भात ट्वीट केलं.

मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानी मंत्री चौधरी फ़व्वाद हुसैन यांनी ‘भारतामधे अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबतही आपण अशाच प्रकारचं सौजन्य आणि सक्रियता दाखवा, असं म्हटलं.

पाकिस्तानच्या ध्वजावरील पांढरा भाग अल्पसंख्यकांच प्रतिनिधित्व करतो आणि देशातील हिंदूही आम्हाला तेवढेच प्रिय आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

 

मुली कोर्टात हजर!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचे आदेश पंजाब सरकारला दिला.

जेव्हा इस्लामाबाद कोर्टात या मुलींना आणण्यात आलं, तेव्हा आपण 18 आणि 20 वयाच्या होत असल्याचं त्यांनी मुख्य न्यायाधिशांसमोर म्हटलं.

त्यामुळे त्या अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं.

तसंच आपण हा विवाह आपल्या मर्जीने करत आहोत आणि धर्मांतरही आपण स्वतःहून करत आहोत, असं या मुलींनी न्यायाधिशांपुढे म्हटलंय.

त्यामुळे मुलींच्या बाजूने निकाल लावण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *