Wed. Jun 19th, 2019

गुजरातमध्ये नथुराम गोडसे जयंती! 6 जणांना अटक

0Shares

महात्मा गांधींची जन्मभूमी असलेल्या गुजरातमध्ये त्यांचीच हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याची जयंती साजरी केली गेल्याची घटना उघडकीस आली आहे. सूरत येथे 16 मे रोजी नथुराम गोडसेची जयंती साजरी केल्याप्रकरणी हिंदु महासभेच्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

 

काय करत होते हे लोक?

सूरत येथील हनुमान मंदिरात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेची जयंती साजरी केली.

गोडसे जयंतीनिमित्त अगदी लाडूदेखील वाटले.

तसंच 109 दिवेही लावून हा उत्सव साजरा केला.

या संदर्भात पोलिसांकडे तक्रार आल्यावर हेमंत सोनार, हिरेन सुमरा, विरल मालवी, योगेश पटेल यांना अटक करण्यात आलंय.

नथुराम जयंतीचा उत्सव साजरा करताना local new channel ला या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासंदर्भात निवेदन दिलं गेलं होतं.

या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणानंतर त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही viral झाले.

त्याच आधारावर करण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा कार्यक्रम करणाऱ्या अनेकांना अटक केली.

याबद्दल प्रतिक्रिया देताना आपलं वर्तन योग्य असल्याचा दावा हिंदू महासभेच्या सदस्यांनी केलाय.

जसे गांधींबद्दल आपुलकी वाटणारे लोक आहेत, तसेच नथुराम प्रेमीही असून त्या प्रेमापोटीच आम्ही या सभेचं आयोजन केल्याचं त्यांनी म्हटलं.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: