Sun. May 16th, 2021

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेचा आत्महत्येचा प्रयत्न

हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. कारागृहात चिंधीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र तुरुंग प्रशासनाने ही अफवा असल्याचे सांगितले आहे.

विकेश नगराळेची न्यायालयीन कोठडी संपली आहे. या नराधमाला काही दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

नागपुरच्या कारागृहात विकेशची रवानगी करण्यात आली होती.

हिंगणघाट जळीतकांडातील प्राध्यापिकेची आठवड्याआधी मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

विकेश नगराळेने या प्राध्यापिकेला कॉलेजला जाताना ३ फेब्रुवारीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान या प्राध्यापिकेचा मृत्यू झाला.

या प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या नराधमाला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *