Wed. Oct 27th, 2021

हिंगणघाट येथील पीडिता अनंतात विलीन

हिंगणघाट येथेली पीडित प्राध्यापिका अनंतात विलीन झाली आहे. पीडितेवर तिच्या दारोडा या गावात अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला मुखाग्नी दिला.

अमर रहे अमर रहे, अशा घोषणा अंत्ययात्रेदरम्यान देण्यात आल्या. या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर जनसुमदाय लोटला होता.

प्राध्यापक लेक गमावल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. आपल्या मुलीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

जळीतकांडातील या पीडितेचा सोमवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनीटांनी मृत्यू झाला. ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनद्वारे पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

पीडितेच्या मृत्यूची माहिती मिळताच राज्याभरातून शोक व्यक्त करण्यात आला. तसेच संताप व्यक्त करण्यात आला. विविध क्षेत्रातील अनेक या घटनेचा निषेध नोंदवला.

विकेश नगराळे या विकृताने 3 फेब्रुवारीला प्राध्यपिका तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता.

आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल.

पीडितेच्या भावाला शासकीय नोकरी देण्यात येणार, असं लेखी आश्वासन वर्ध्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे आणि उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

वर्णन करता येणार नाही, इतकी भयानक ही घटना आहे. सर्वांनी धीर धरा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

हिंगणघाट प्रकरण : अपराध्याला शिक्षा दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही – मुख्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *