हिंगणघाट जळीतकांड : विशेष सरकारी वकील म्हणून एड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेत तपासात दिरंगाई होऊ दिली जाणार नाही. पीडिता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील.
खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा रितीने चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
दरम्यान उज्ज्वल निकम हे दहशतवादी प्रकरणातील स्पेशालिस्ट समजले जातात. उज्जवल निकम यांनी हाती घेतलेली केस निकाली काढतात. याआधी उज्जवल निकम यांनी अनेक खटले निकाली काढले आहेत. मुंबईवर झालेल्या २६-११ च्या हल्लयातील जिवंत आतंकवादी कसाबची केस उज्जवल निकम यांच्याकडे देण्यात आली होती.