Wed. Jul 28th, 2021

हिंगोलीच्या कोविड रुग्णालयात बालकामगारांकडून सफाई काम

हिंगोली: हिंगोली शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या कोव्हिड रुग्णालयात चक्क अल्पवयीन मुलांकडून जैविक कचरा उचलण्यासाठी त्याचबरोबर रुग्णालयाच्या आवारातील सफाई करण्यासाठी कामावर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही साहित्यांचे वितरण केले जात नाही. केवळ सर्जिकल मास्कच्या आधारे त्यांना रुग्णालयात साफसफाई करण्याकरिता पाठवले जाते. तब्बल दहा ते पंधरा मुले गेल्या अनेक दिवसांपासून कोव्हिड रुग्णालयातील जैविक कचरा उचलण्याचे काम करत असल्याची माहिती एका बालकामगाराने स्वतः ‘जय महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

रुग्णालय सफाईचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आले असून शासनाच्या वतीने या कामाच्या बदल्यात संबंधित संस्थेला निधीही दिला जातो. संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्यांची संस्था काळ्या यादीत टाकण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *