धक्कादायक ! तुर विक्रीसाठी शेतकऱ्यांना सांगावी लागतेय जात

हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांना तूर डाळ विक्रीसाठी चक्क जात सांगावी लागत आहे.

यासर्व प्रकारामुळे शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासर्व प्रकरणावर संबंधित दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा.

अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांनी देण्यात आले आहे.

हिंगोलीतील नाफेड केंद्रामध्ये शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी जात सांगावी लागत आहे.

शेतकऱ्यांची खासगी बाजारात लूट होते. ही होणाऱ्या लुटीला चाप बसावा, यासाठी शासनाच्या वतीने नाफेड खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे.

या अंतर्गत शेतकऱ्यांनी पिकविलेला माल सरकार खरेदी करते.

परंतु यावर्षी शेतकऱ्यांना स्वतःची तुर नाफेड केंद्रांमध्ये विक्री करण्यासाठी चक्क जात विचारल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाफेड तूर नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने फॉर्म देण्यात आलेला आहे.

त्यामध्ये नोंदणीच्या कार्यामध्ये जात विचारली जात आहे. हे या प्रकारामुळे शेतकरी चांगलेच गोंधळून जात आहेत.

विशेष म्हणजे मोठ्या कष्टाने पिकविलेल्या शेती मालाच्या विक्रीसाठी प्रवर्गनिहाय वर्गीकरण नेमके कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नोंदणीच्या कारखान्यांमध्ये हे (इमाव) म्हणजेच ओबीसी, शेड्युल कास्ट म्हणजेच (SC),ST आणि Open अशा प्रवर्गांचा उल्लेख केला आहे.

नोंदणीसाठी तुमची जात कोणत्या फॉरमॅटमध्ये बसते ते अगोदर निश्चित करा. यानंतरच तुर विक्री करा, असा जणू आदेशच सरकारने दिल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version