Wed. Jul 28th, 2021

शारिरीक व्यायामासाठी हिंगोली पोलिसांचा अनोखा उपक्रम

हिंगोली शहरांमधील वाहतूक शाखा नेहमीच विविध उपक्रमाने चर्चेत राहते. त्याचप्रमाणे आजही हिंगोली वाहतूक शाखेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली.

यामागील उद्देश असा की वाहतूक शाखेमध्ये काम करणारे सर्व पोलिस कर्मचारी यांना बराच वेळ उभा राहून व्यवस्थापन करावे लागते. कामाच्या व्यापाने शारीरीक व्यायाम होत नाही. त्यामुळे आजार होतात.

त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी नेहमी सायकल चालवणे उत्तम मानले जाते. याच उद्देशातून आज हिंगोली शहरांमध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या सायकल रॅलीमध्ये वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर सह शहरातील वाहतूक शाखामध्ये काम करणारे सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *