Jaimaharashtra news

हिंगोलीत फक्त मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाऊनही सरकारी अधिकाऱ्यांचं पोट भरलं नाही तर…

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

 

हिंगोलीत फक्त मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाऊनही सरकारी अधिकाऱ्यांचं पोट भरलं नाही. तेव्हा त्यांनी विहीरही गायब करुन दाखवली.

 

अनेक ठिकाणी कागदावर विहीरींचं पुनर्भरण करण्यात आलं, प्रत्यक्षात विहिरीचं पुनर्भरण झालंच नाही.

 

हिंगोलीतील येळी गावात अधिकाऱ्यांची ही खाबुगिरी उघड झाली. येळी गावातला शेतकरी गणपत शेळक या शेतकऱ्याच्या शेतात विहिर पुनर्भरणाचं काम दाखवून पैसे

उचलण्यात आले. पण विहिरीचं प्रत्यक्ष पुनर्भरण झालं नाही.  

 

गावातील सामाजिक कार्यकर्ते मन्मथ महाजन यांनी भ्रष्टाचाराची तक्रार केली, पण प्रशासकीय स्तरावर 2 वर्षांपासून फक्त कागदी घोडे नाचवण्यात येत आहेत.

Exit mobile version