Wed. Oct 27th, 2021

आता BA च्या अभ्यासक्रमात R.S.S.चा इतिहास!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला स्थान मिळालंय. देश उभारणीत संघाचं स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘BA’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात धडे शिकवण्यात येणार आहेl. विशेष म्हणजे मागील वर्षीपर्यंत त्या जागेवर ‘कम्युनॅलिझम’चा विकास या मुद्याला स्थान होते. नागपूर संघाचे मुख्यालय असून पहिल्यांदाच अशा प्रकारचा बदल झाला. यावर आता टीका व्हायला सुरवात झाली…

काय असणार आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात?

नागपूर विद्यापीठातील ‘BA’(इतिहास)च्या अभ्यासक्रमात यावर्षी बदल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षापर्यंत द्वितीय वर्षातील (Second Year) चतुर्थ सत्रात (semester IV) ‘भारताचा इतिहास 1885-1947’ या पेपरमध्ये तिसऱ्या ‘युनिट’मध्ये ‘कम्युनॅलिझम’चा उदय व विकास, क्रिप्स मिशन व कॅबिनेट मिशन प्लॅन या तीन मुद्यांना स्थान होतं.

मात्र आता बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ‘कम्युनॅलिझम’च्या जागेवर देशाच्या उभारणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान या मुद्याला स्थान मिळालंय.

विशेष म्हणजे संपूर्ण पेपरमधून ‘कम्युनॅलिझम’चा इतिहासच हटविण्यात आला आहे.

या सत्रापासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत हे धडे शिकवण्यात येणार आहेत.

विद्यापीठाने संकेतस्थळावरदेखील नवीन अभ्यासक्रम ‘अपडेट’ केला आहे.

‘MA (इतिहास)’च्या अभ्यासक्रमात आधीपासूनच RSS बाबत शिकवण्यात येतंय.

‘MA’च्या चौथ्या सेमिस्टरमध्ये ‘आधुनिक विदर्भाचा इतिहास’ या पेपरला चौथ्या ‘युनिट’मध्ये संघाचा मुद्दा आहे.

विदर्भातील सर्वच मोठ्या संघटनांचा अभ्यास यात करण्यात येतो.

पदवी स्तरावरदेखील विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी, यासाठी ‘बीए’मध्ये बदल करण्यात आला आहे, असं अभ्यास मंडळाने सांगितलंय.

RSS कडून स्वागत!

अभ्यासक्रमामध्ये संघाला स्थान दिल्याचं संघाकडून स्वागत करण्यात आलंय.

संघ जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे.

देशाच्या विकासात संघ आणि स्वयंसेवकांचे मौलिक योगदान आहे.

पदवी स्तरावर विद्यार्थ्यांना याची माहिती होतेय, ही चांगली बाब आहे. विद्यार्थ्यांना यामुळे सामाजिक वर्तुळाची माहिती होईल, असे संघाचे पदाधिकारी असलेले सुधीर पाठक यांनी सांगितले .

निर्णयावर टीका

मात्र समाजातील दुसरा वर्ग असा जो या गोष्टीचा विरोध आहे.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भाजप सत्तेत आहे त्यामुळे या संघटनेचा इतिहास अभ्यासक्रमात आला.

उद्याला दुसऱ्या पक्षाची सत्ता आली तर त्यांच्या संघटना आपला इतिहास अभ्यासक्रमात सहभागी करण्यास आग्रही राहील.

काहीना वाटतं की आपला देश धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा त्यामुळे धार्मिक विचार अभ्यासक्रमात नसावे.

हा वाद पुढील काळात राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे.

त्याचे काय पडसाद देशाच्या राजकारण पडेल हे बघणं महत्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *