मद्यधुंद कारचालकाकडून चार दुचाकीस्वार जखमी!

नागपूरच्या लक्ष्मीनगर भागात एका मद्यधुंद कार चालकाने हिट एन्ड रन करत चार दुचाकीस्वारांना जखमी केलं आहे. मद्यधुंद कार चालक स्वतः ही दुभाजकावर कार धडकवून गंभीर जखमी झाला आहे.

मद्यधुंद कारचालकाकडून अपघात

10 मे रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास उच्चभ्रू लक्ष्मीनगर भागात भरधाव स्विफ्ट कारने अक्षरशः हैदोस घातला.

सुरुवातीला मद्यधुंद स्विफ्ट चालकाने आठ रस्ता चौकावर एका दुचाकी स्वराला उडवलं.

त्यानंतर अशोक हॉटेलसमोर काहींना धड़क दिली.

त्यानंतरही न थांबता स्विफ्ट कार लक्ष्मीनगर चौकाच्या दिशेने पळाली.

लक्ष्मीनगर चौकावरून बजाजनगरकडे वळसा घेण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर धड़कली.

या अपघातात आरोपी चालकासह एकूण 4 लोक जखमी असून दोघे जास्त गंभीर जखमी आहे…

आरोपी वाहन चालकाचे नाव टी के रवींद्र राव (55 वर्ष) आहे. पोलिसांनी या प्रकरणी दारू पिऊन rash driving केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version