Tue. Sep 17th, 2019

Hit And Run: फुटपाथवर आई आणि मुलाचा जागीच मृत्यू

0Shares

मुंबईमध्ये हिट अँड रन प्रकरणात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आई मुलगा आणि नात हे तिघेही फुटपाथवर उभे होते. अचानक आलेल्या कारने या तिघांना उडवले आहे. यामध्ये मुलगा आणि आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नात या अपघातात बचावली आहे.

नेमकं काय घडलं?

सोमवारी रात्री 3 जून रोजी हिट अँड रन प्रकरणात दोघांचा मृत्यू झाला आहे.

भरधाव कारने फुटपाथ जवळ उभे असलेल्या तीन जणांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ललिता पाटील आणि अमोल पाटील हे आपल्या नातीसह सीवूड सेकटर- 50 येथे फुटपाथवर उभे होते.

अचानक आलेल्या कारने ललिता पाटील आणि अमोल पाटील यांना त्यांच्या नातीसहित उडवले आहे.

यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला असून नातं बचावली आहे.

कार चालक आमीर मोहंमद इस्माईल अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *