Mon. May 17th, 2021

हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम, ठरला पहिला भारतीय

मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माने नवा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे.

रोहित शर्माने वेस्ट इंडिज विरुद्धातील तिसऱ्या टी-20 मध्ये 400 वा सिक्स मारला. रोहितने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कॉट्रेलच्या बॉलिंगवर सिक्स मारत हा विक्रम केला.

यासह रोहित शर्मा 400 सिक्स मारणारा पहिला भारतीय तर क्रिकेट विश्वातील तिसरा खेळाडू ठरला आहे.

क्रिकेटच्या तीनही प्रकारात रोहितने मारलेले सिक्स

वनडे – 232
टी-20 – 116
टेस्ट – 52

रोहितशिवाय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 सिक्सचा टप्पा केवळ 2 खेळाडूंनीच ओलांडला आहे. विडिंजच्या क्रिस गेल तर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने ही कामगिरी केली आहे.

क्रिस गेलने एकूण 534 सिक्स ठोकले आहेत. तर शाहिद आफ्रिदीने 476 सिक्स मारले आहेत.

टीम इंडियाकडून सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या, सचिन तेंडुलकर तिसऱ्या, युवराज चौथ्या तर सौरव गांगुली पाचव्या क्रमांकावर आहेत.

खेळाडू आणि सिक्स

एमएस धोनी : 359

सचिन तेंडुलकर : 264

युवराज सिंह : 251

सौरव गांगुली : 247

दरम्यान विडिंज विरोधातील 3 टी-20 सामन्यातील सीरिजमध्ये टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून कोणती टीम सीरिज जिंकते, याकडे सर्व क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *