Tue. Sep 28th, 2021

HIV वर उपचार आता शक्य, लंडनच्या डॉक्टरांचा दावा

नाईलाज समजल्या जाणाऱ्या HIV वर आता उपचार शोधून काढण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या जीवघेण्या रोगावर डॉक्टरांनी खात्रीलायक उपाय शोधू काढलाय. लंडनच्या एका हॉस्पिटलमध्ये स्टेम सेल ट्रान्सप्लांटद्वारे एका रुग्णाला HIV मुक्त करण्यात आलय.

जगामध्ये दरवर्षी 10 लाख लोक HIV मुळे मृत्युमुखी पडतात.

1981 पासून आतापर्यंत कोट्यवधी लोकांचा प्राण गेलाय.

जगातील एकूण लोकसंख्यैपेकी 0.6 टक्के लोक HIV ग्रस्त आहे.

त्यामुळे या संधोधनामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश मिळणार आहे.

मेडिकल जर्नल नेचरमध्ये हे संधोधन पुढ आलंय.

मेडिकल जर्नलमध्ये आलेल्या माहितीनुसार लंडनमध्ये 2003 मध्ये एका रुग्णाला HIVची लागण झाली.

2012 मध्ये या रुग्णावर उपचार सुरू झाले.

लंडनच्या HIV रुग्णाला बरं करण्यासाठी डॉक्टरांना स्टेम सेल डोनर हवा होता.

मात्र डोनरच्या शरीरात HIV ला प्रतिकार करणार दुर्लभ जीन म्यूटेशन असणं गरजेचं होतं.

डॉक्टरांना या उपचारामध्ये यश मिळालं.

स्टेम सेल ट्रांसप्‍लांट केल्यानंतर HIV रुग्णांची अंतर्गत प्रतिकार शक्तीची यंत्रणा बदलली आणि शरीरातले एचआयव्ही वायरस नष्ट झाले.

18 महिन्यानंतर या रुग्णाला औषध देणं बंद करण्यात आलं.

 

HIV वायरस परत सक्रीय होतो का, याची चाचणी करण्यासाठी औषध देण बंद केलं गेलं, मात्र या रुग्णाच्या शरीरात HIV व्हायरस परत आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *