Fri. Sep 30th, 2022

#PulwamaAttack: पाकिस्तानातून हॉकी स्टिक्सची आयात मंदावली

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध तणावग्रस्त असल्याचा फटका हॉकी क्षेत्रालाही बसला आहे.

सीमारेषेपलीकडून येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्क्यांनी सीमाशुल्क वाढवण्यात आल्यानं सचिन या लोकप्रिय हॉकी स्टिक्सची आयात पूर्णपणे मंदावली आहे.

भारत ही आमची सर्वात मोठी बाजारपेठ असून सियालकोटमध्ये आम्ही दर महिन्याला किमान 9 हजार हॉकी स्टिक्सचे उत्पादन घेतो.

त्यापैकी 1500 हॉकी स्टिक्स भारतात पाठवल्या जातात.

आमचे सर्वाधिक ग्राहक हे जालंधरमधील आहेत. सद्य:स्थितीत पाकिस्तानकडून आयात होणाऱ्या हॉकी स्टिक्सचे उत्पादन स्थगित करण्यात आले आहे, असे सचिन या ब्रँडचे मालकांनी सांगितले आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 4 वर्षांत हॉकी स्टिक्सची आयात वाढली आहे. 2015-16 साली जवळपास 24.48 लाख रुपयांच्या हॉकी स्टिक्स पाकिस्तानकडून मागवण्यात आल्या होत्या.

मात्र सध्याच्या आर्थिक वर्षांत ही उलाढाल 2 कोटी रुपयांच्या वर गेली आहे. पाकिस्तानकडून जवळपास 90 टक्के स्टिक्स या आयात केल्या जात आहेत.

सियालकोटमध्ये उत्पादन केलेल्या हॉकी स्टिक्स या जालंधरच्या तुलनेत दर्जेदार आहेत.

याआधी सहजतेने चांगल्या दर्जाच्या भारतीय स्टिक्स उपलब्ध व्हायच्या. पण गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे.

पण सध्या भारतीय बनावटीच्या दर्जेदार स्टिक्स शोधूनही सापडत नाहीत.

पाकिस्तानमधून येणाऱ्या स्टिक्स या स्वस्त आणि तांत्रिकदृष्टय़ा सरस ठरत आहेत, असे भारतीय संघातील एका हॉकीपटूने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.