Fri. Nov 15th, 2019

Hockey World Cup 2018: बेल्जियमला बरोबरीत रोखत भारताचा अंतिम आठमध्ये प्रवेश निश्चित

पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवून देणाऱ्या या लढतीत भारतीय संघाने बेल्जियमला 2-2 असे बरोबरीत रोखले.

रविवारच्या या सामन्यात बेल्जियमने पहिल्या पाच मिनिटांत सामन्यावर मजबूत पकड घेतली. पहिल्याच मिनिटाला मिळालेले दोन कॉर्नर परतवण्यात गोलरक्षक पीआर श्रीजेशला यश आले. मात्र, 8 व्या मिनिटाला अॅलेक्सांडर हेंड्रीक्सने कॉर्नरवर गोल करताना बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. परंतु सिमोन गौगनार्डने बरोबरीचा गोल केला. अखेरच्या तीन मिनिटांत अनुभवी गोलरक्षक पी आर श्रीजेशने बेल्जियमचा गोल अडवला. भारताने ‘C’ गटात अव्वल स्थानासह उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. गोल फरकाच्या जोरावर भारतीय संघ आघाडीवर आहे.

 

hockey12.jpg

बरोबरीच्या गोलनंतर दोन्ही संघांमध्ये चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. बलाढ्य बेल्जियमच्या चपळतेला भारतीय खेळाडूंना उत्तर देण्यास अवघड जात होते, परंतु कोठाजीतने डावीकडून केलेल्या पासवर सिमरनजीत सिंगने गोल करत भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. या गोलने बेल्जियमचे धाबे दणाणले.

 

hockey13.jpg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *