Wed. Jun 29th, 2022

वृंदावन बांके बिहारी मंदिरात होळीचा उत्सव

देशभरात होळीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. देशातील वेगवेगळ्या भागात होळी वेगवेगळ्या प्रकाराने साजरी केली जाते. उत्तर प्रदेशमधील मथुरेची होळी देशात विशेष प्रसिद्ध आहे. मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरात होळीचा उत्सव सुरू धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. यंदाही नागरिकांमध्ये होळी साजरी करताना उत्साह पाहण्यात आला.

कोकणात शिमगोत्सव साजरा

कोकणात कोरोनाचे निर्बंध दोन वर्षानंतर उठल्यानंतर शिमगा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. चाकरमानीदेखील मोठ्या संख्येने आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत. कोकणातील प्रत्येक गावात होळीच्या काही रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात. शिवाय, काही ठिकाणी असलेल्या होळी आणि त्या ठिकाणचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो. रायगडमध्ये श्रीवर्धनमधील गोमूचा नाच पाहायला मिळाला.

शिवाजी पार्कात धुळवडीचा उत्साह

आज राज्यभरात मोठ्या उत्साहात धुलीवंदन कोरोनाचे नियम पाळून साजरे केले जात आहे. जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे नागरिकांना सण साजरे करता आले नाही. मात्र, आता निर्बंध शिथिल केल्यामुळे दादरच्या शिवाजी पार्कात धुळवडीचा उत्साह पाहण्यात आला. तर ८५ वर्षाच्या जगदीश कुलकर्णी यांनी नाचत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.