Mon. Jan 24th, 2022

ग्राहकांसाठी जिओकडून होळी गिफ्ट

जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांसाठी जिओने 4G स्मार्टफोन आणणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या फोनची किंमतही अगदी कमी असणार आहे.

आत्ताचे ग्राहक हे 2G फोन वापरत आहेत. मात्र हा फोन बाजारात आणल्यास तेच ग्राहक हा फोन वापरण्यास सुरूवात करतील असे जिओचे म्हणणे आहे.

2G फोन वापरणाऱ्या ग्राहकांना 4G फोन घेण्यासाठी सवलत दिली जाणार आहे.  

आता या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांसाठी कोणते फिचर्स असणार आहेत. तसेच हा फोन ग्राहकांच्या पसंतीस पडतोय की नाही हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.

याआधी जिओ कंपनीने दिड हजार किंमतीचा 4G फोन बाजारात आणला होता. त्यानंतर आता जिओ 4G स्मार्टफोन आणत आहे.

हा स्मार्टफोन बाजारात आणण्यामागचे कारण म्हणजे जिओ कंपनीला आपल्या सबस्क्राइबर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करायची आहे.

आता सध्या जिओचे सबस्क्राइबर्स 37.5 कोटी इतके आहेत. आता हा आकडा 50 कोटीहून आधिक करण्याचे जिओने ठरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *