Fri. Jun 18th, 2021

गृह, वाहन, लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जं होणार उपलब्ध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्जं उपलब्ध होणार आहेत. परिणामी, कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे.

प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर रिझव्‍‌र्ह बँकेने आता सक्तीचा बडगा उगारला आहे.

यापूर्वी अनेकदा रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी केले नाहीत.

रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर अनेकदा कमी करूनही व्यापारी बँका मात्र त्या प्रमाणात कर्ज व्याजदर कमी करत नाही, अशी खंत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केली होती.

बँकांनी येत्या 1 ऑक्टोबरपासून त्यांचे नवे बदलते (फ्लोटिंग) गृहादी कर्ज व्याजदर हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दरांशी निगडित ठेवावेत, तसेच वाहन, लघू उद्योगांसाठीही अशी रेपो दर संलंग्न व्याजदर उत्पादने असावीत असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दर बदलाचा थेट व त्वरित लाभ कर्जदारांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *