Wed. Jun 29th, 2022

गृहविभाग भाजपच्या ट्वीटर हॅन्डलवर करणार कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला. त्यामुळे शरद पवारांच्या भाषणातील संदर्भाने नवा वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजपच्या ट्विटर हॅन्डलवर कारवाई करणार असल्याचे गृहविभागाने सांगितले आहे. तसेच भाजपाने पवारांचा अर्धाच व्हिडिओ ट्विट केला असल्याचे गृहविभागाने सांगितले आहे.

भाजपा महाराष्ट्राच्या ट्विटर हॅंडलवरून शरद पवार यांचा साताऱ्यातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यामध्ये पवारांनी हिंदू देवदेवतांचा कशाप्रकारे अपमान केला आहे, हे भाजपाकडून अधोरेखित करण्यात आले आहे. याची दखल गृहविभागाने घेतली असून भाजपच्या ट्विटर हॅन्डलवर कारवाई करणार असल्याचे गृहविभागाने सांगितले आहे.

पवारांचं वक्तव्य भाजपकडून ट्विट

भाजपाने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये लिहिले की, शरद पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले आहेत. शरद पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेतांचा अपमान केला नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा, असे भाजपने केलेल्या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.

पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीची भूमिका

दरम्यान, आम्ही तुमच्या देवाचे बाप या शरद पवारांच्या भाषणातील वक्तव्यावरून नवा वाद पेटला आहे. यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला वाटते भाजप आता तोड-मोडके जोड के बोल अशा भूमिकेत असून विधानांचे वेगवेगळे अर्थ काढायच्या भूमिकेत आहेत. पवारांनी कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचा उल्लेख भाषणात केला आहे. या कवितेत म्हटले आहे की, आम्ही मूर्ती चीनी हातोड्यापासून वापर करून मूर्तीला आकार देतो. म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांचे बाप असं होतं. परंतु पवार हिंदू धर्माची बदनामी करतात, असा केवीलवाणा आरोप भाजप करत आहे. महाराष्ट्राच्या जनेतला पवारांचे राजकीय, धार्मिक, सामाजिक विषय माहित आहे. मात्र, भाजपने पवारांची तेवढीच ओळ टाकली असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहे. जऱ शरद पवारांचे पूर्ण भाषण टाकले असते तर हा वाद निर्माण झाला नसता, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.