Jaimaharashtra news

नागपूर पोलिसांचं महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं पाऊल

नागपूर : पोलिसांनी महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं पाऊल उचलले आहे. कामानिमित्त तसेच इतर काही कारणांमुळे रात्रीच्या वेळी महिलांना घर गाठण्यास उशीर होतो. अशा वेळेस घरी जाण्यासाठी वाहतूकीची सुविधा नसल्यास पोलीस घरापर्यंत सोडणार आहे

महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि महिला सुरक्षेविषयी निर्माण झालेले प्रश्न बघता हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. रात्री ९ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत ही सुविधा देण्यात येणार आहे.

ही सेवा कंट्रोल रूम आणि पोलीस स्टेशन मधून देण्यात येणार आहे. मात्र एखादवेळी पोलीस पोहचायला उशीर होत असेल तर बाईक वरील बिट मार्शल त्या ठिकणी पोहचतील. तसेच पोलीसांची संबंधित ठिकाणी येईपर्यंत महिला पोलीस सोबत थांबणार आहेत.

मात्र या सुविधेचा गैर वापर करणाऱ्यावंर कारवाई करण्यात येणार आहे.

Exit mobile version