Thursday, November 13, 2025 02:41:13 PM

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक पराक्रम! बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडून स्थापन केला नवा विश्वविक्रम

या विश्वचषकात हरमनप्रीतकडून मोठ्या खेळींची अपेक्षा होती. तिने नऊ सामन्यांमधील आठ डावांत एकूण 260 धावा केल्या असून तिची सरासरी 33 इतकी आहे.

harmanpreet kaur हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक पराक्रम बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडून स्थापन केला नवा विश्वविक्रम

Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात तिच्या बॅटने फारशी चमक दाखवली नाही, पण तिने आपल्या नावावर एक मोठा जागतिक विक्रम नोंदवला आहे. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या फायनल सामन्यात हरमनप्रीतने 29 चेंडूत 20 धावा केल्या, परंतु या छोट्या खेळीद्वारे तिने एक सर्वकालीन विश्वविक्रम मोडला आणि महिला विश्वचषकाच्या इतिहासात एक नवे पर्व लिहिले.

हरमनप्रीत कौरचा नवा विश्वविक्रम

हरमनप्रीत कौर आता आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात नॉकआउट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज बेलिंडा क्लार्कचा विक्रम मागे टाकत हा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पूर्वी हा विक्रम बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता, जिने सहा डावांत 330 धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौरने केवळ चार डावांमध्ये 331 धावा करून हा विक्रम मोडला. तिच्या मागे अॅलिसा हिली (309 धावा), नॅट सायव्हर-ब्रंट (281 धावा) आणि डेबी हॉकले (240 धावा) या खेळाडूंची नावे आहेत.

हेही वाचा - IND-W vs SA-W Final: भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य; शेफाली आणि दीप्तीने झळकावले अर्धशतक

विश्वचषकात हरमनप्रीतची कामगिरी

या विश्वचषकात हरमनप्रीतकडून मोठ्या खेळींची अपेक्षा होती. तिने नऊ सामन्यांमधील आठ डावांत एकूण 260 धावा केल्या असून तिची सरासरी 33 इतकी आहे. या काळात तिने दोन अर्धशतके झळकावली आहेत. फायनलमध्ये मोठी खेळी न करता परतल्यामुळे चाहत्यांना थोडा निराशा वाटली, मात्र या विक्रमामुळे ती पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा अभिमानाचा विषय ठरली आहे.

हेही वाचा - IND vs AUS 3rd T20: वॉशिंग्टन सुंदरची तुफानी खेळी! टीम इंडियाकडून तिसऱ्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव

हरमनप्रीत कौरने सिद्ध केलं आहे की ती भारतीय महिला क्रिकेटची खरी कॅप्टन मार्व्हल आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारत महिला क्रिकेट जगतात सतत नवे मापदंड गाठत आहे. तिच्या नावावर आता नॉकआउट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान असून, तिने भारतीय क्रिकेट इतिहासात नवा अध्याय जोडला आहे.


सम्बन्धित सामग्री